Fri. May 7th, 2021

जगातील प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली ११व्या क्रमांकावर

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या लिस्टमध्ये देशाची राजधानी दिल्लीचा समावेश असून गुरुग्राम हे सर्वात जास्त प्रदूषित शहर असल्याचे एका अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये भारतातील गुरुग्राम हे पहिल्या क्रमांकावर असून गाजियाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच देशाची राजधानी ११व्या क्रमांकावर आहे. या लिस्टमध्ये हरियाणाचे फरिदाबाद चौथ्या क्रमांकावर, तर नोएडा सहाव्या क्रमांकावर आहे. प्रदूषित शहरांच्या टॉप १० लिस्टमध्ये भारताचे पाच शहरं असल्यामुळे भारतात प्रदूषण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारताचे पाच शहरं सर्वाधिक प्रदूषित –

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या लिस्टमध्ये देशाची राजधानी दिल्ली ११व्या क्रमांकावर आहे.

तसेच विश्वातील टॉप १० प्रदूषित शहरांमध्ये भारताचे पाच शहरं सर्वाधिक प्रदुषित असल्याचे समोर आले आहे.

आयक्यू एअर व्हिज्युअल २०१८ वर्ल्ड एअर क्वालिटी आणि ग्रीनपीस एनजीओ साऊथ एशिया यांच्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे.

गुरुग्राम आणि गाजियाबादनंतर पाकिस्तानचे फैसलाबाद तीसऱ्या क्रमांकावर आहे.

ही क्रमवारी पीएम २.५च्या स्तराच्यानुसार करण्यात आली आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत गुरुग्राममध्ये यावर्षी कमी प्रदुषणाची नोंद करण्यात आली आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *