Tue. Oct 19th, 2021

दिल्लीत स्वामीनाथन आयोग लागू होणार?

दिल्लीच्या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करणार असल्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे पहिले राज्य ठरणार आहे. यामुळे दिल्लीच्या शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगानुसार हमीभाव मिळणार असल्याने दिल्लीच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी… दिल्ली सरकारचे क्रांतिकारी पाऊल. देशात पहिल्यांदाच स्वामीनाथन आयोग दिल्लीत लागू होणार आहे, असे केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.

स्वामीनाथन आयोग म्हणजे काय ?

2000 साली कृषीवैज्ञानिक डॉ एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली  शेतकरी आयोग स्थापन केले.

2004 ते 2006 या दोन वर्षात स्वामीनाथन आयोगाने देशातील 20 राज्यांत प्रवास केला.

स्वयंसेवी संस्था, शेतकरी संघटना, कृषी महाविद्यालये, हवामान खाते, पाटबंधारे खाते, कृषी उत्पन्न बाजार समिती, कर्ज पुरवठादार बँका अशा अनेक घटकांशी संवाद साधला.

5 अहवाल सादर केल्यानंतर पाचवा अहवाल ग्राह्य मानला जातो.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *