दिल्ली हिंसाचार : मृतांचा आकडा 40 वर

दिल्ली हिंसाचाराताली मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा हा 40 पार गेला आहे. तसेच झालेल्या हिंसाचारामध्ये २५० पेक्षा जास्त जणं जखमी झालेत.
राजधानीत दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून एनआरसी सीएएवरुन हिंसक आंदोलन सुरु आहे.
दिल्लीतील दंगलखोरांविरोधात आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच ६०० पेक्षा अधिक संशयितांना अटक केली आहे. याबाबतची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
तसेच कोणत्याही भागात आता हिंसाचार होऊ नये याची पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. जागोजागी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या हिंसाचारामध्ये भजनपुरा, चांदबाग, मौजपूर, खुरेजी खास आणि झाफराबाद, या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
तसेच दिल्लीतील झालेल्या हिंसाचारात घराचं नुकसान झालेल्यांना दिल्ली सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहेृ.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दंगलीत घराचं नुकसान झालेल्यांना २५ हजारांची मदत दिली जाणार आहे.