Sat. Oct 1st, 2022

Delhi Election 2020 : दिल्लीकराचं मत दिल्लीचं भवितव्य ठरवणार – नरेंद्र मोदी

दिल्ली विधानसभा निवडणुकच दिल्लीचं भवितव्य ठरवणार आहे. दिल्लीतल्या मतदारांमुळेच दिल्लीचं भविष्य बदलणार असल्याचं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडकडडूमा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. मोदींची दिल्ली विधानसभेसाठीची ही पहिली प्रचारसभा आहे.

लोकसभा निवडणुकीत दिल्लीकरांनी एक एक मताने भाजपची ताकद वाढवली. दिल्लीतून भाजपचे  ७ खासदार निवडून देत दिल्लीकरांनी त्यांचा कौल दिला.

अधिक वाचा : Delhi Election 2020 : सत्तेत आल्यास CAA ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार, काँग्रेसचा वचननामा

देशाला बदलण्यासाठी दिल्लीतील जनतेने खूप मदत केली आहे. आता दिल्लीकरांचं मत दिल्लीला बदलेलं, अशा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

भाजप दिलेलं प्रत्येक आश्वसन पूर्ण करतं. जे बोलतं ते करतं. भाजपसाठी देशाचं आणि देशातील जनतेचं हित हे सर्वात आधी असल्याचं मोदी म्हणाले. भाजप नकारत्मकतेत नाही सकारत्मकतेत विश्वास ठेवतं, असही मोदी म्हणाले.

दिल्लीत होणारं मतदान केवळ सरकार स्थापनेसाठी नाही तर या दशकात दिल्लीचा विकास स्तर नव्या उंचीवर नेवून ठेवण्यासाठी असेल, असंही मोदी म्हणाले.

दरम्यान दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दिल्लीत एकूण ७० जागांसाठी हे मतदान होणार आहे. तर ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यमान विधानसभेचं कार्यकाळ हा २२ फेब्रुवारीला संपणार आहे.

पक्षीय बलाबल

एकूण जागा : 70

आम आदमी पार्टी : 67

काँग्रेस : 03

भाजप : 00

अधिक वाचा : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.