Thu. Sep 29th, 2022

अडीच लाखात पोटच्या गोळ्याचा जन्मदात्रीकडूनच सौदा

केवळ १० दिवसांच्या आपल्या पोटच्या गोळ्याला विकणाऱ्या आईसह आणखी ४ आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबईतील उलवे सेक्टर २०मध्ये एक महिला आपल्याच १० दिवसांच्या मुलीला अडीच लाखात विकणार असल्याचे समजले असता, एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्यासह पोलिसांनी सापळा रचत मुलीच्या आईसह आणखी चार आरोपींना ताब्यात घेतले.

या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली असता रीतसर दत्तक घेण्याची कोणतीही प्रिक्रिया आढळली नाही. त्यामुळे नवजात बालकाची अनधिकृरीत्या विक्री होणार असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केले आहे. अर्भकाच्या सौद्याप्रकरणी आईसह चार आरोपींना पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत.

आरोपीकडून ४ मोबाईल, पॅनकार्ड आणि पन्नास हजार रुपयाचे पाच बंडल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यावेळी आई आणि मुलीला भिवंडीच्या बाल कल्याण समितीकडे हजर करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.