Fri. Dec 3rd, 2021

किमान उपमुख्यमंत्री पद तरी द्या हो! शिवसेनेची भाजपाकडे मागणी

येत्या लोकसभा निवडणूका लक्षात घेवून भाजप आणि शिवसेनेची युती झाली.

परस्परांवरविरूध्द  टोकाची टिका आणि स्वबळावर लढण्याची भाषा करून अखेर महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार याविषयी संभ्रम असताना किमान उपमुख्यमंत्री पद तरी द्याव अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

उपमुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेअंतर्गत रस्सीखेच

भाजप-शिवसेनेने महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली.

भाजप-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून तिढा असताना यातच  मुख्यमंत्र्याकडे शिवसेनेने उपमुख्यमंत्री पदाची मागणी केल्याची माहिती आहे.

आता किमान उपमुख्यमंत्री पद तरी द्या, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

युतीमधील आमदारांच्या स्नेहभोजनावेळी मुख्यमंत्र्यांपुढे खाजगीत प्रस्ताव मांडला.

उपमुख्यमंत्री पद मिळाले तर युतीतील कार्यकर्त्यांमध्ये चांगला संदेश जाईल.

त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्ते अधिक जोमाने काम करतील.असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र उपमुख्यमंत्री पदावरून शिवसेनेअंतर्गत स्पर्धा चालू आहेत.

पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि रामदास कदम यांच्यामध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा चालु असल्याची माहीती आहे.

भाजप-शिवसेना युतीच्या घोषणेवेळी राज्यात अधिकार आणि जबाबदारीचे समान वाटप हे सूत्र ठरले.

या सूत्रानुसार भविष्यात शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळाल्यास आपला दावा मजबूत राहावा यासाठी शिवसेना नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *