परमबीर सिंहविरोधात अजामीनपात्र वॉरंटची मागणी

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केली आहे. ठाणे न्यायालयाने परमबीर सिंह यांना अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.
मुंबई क्राईम ब्रॅचचे युनिट ११ परमबीर सिंह यांच्यावर दाखल झालेल्या वसुलीच्या गुन्ह्याचाही तपास करत आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र ते उपस्थित राहिले नाही तसेच त्याबाबत योग्य उत्तरही दिले नाही. त्यामुळे या प्रकारानंतर त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले असल्याबाबतचे पत्र परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्याप्रकरणी चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली. चांदीवाल आयोगाने यापूर्वीही परमबीर सिंह यांना हजर राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता.