Jaimaharashtra news

अयोध्येत भव्य बुद्ध विहार बांधावं, रामदास आठवले यांची मागणी

अयोध्येमध्ये भव्य बुद्ध विहार बांधण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यांनी याबद्दल एक ट्विट केलं आहे.

काय म्हणाले आठवले ?

अयोध्येत श्री रामांचं मंदिर वेगाने बांधायला हवं. तसेच मशिदीसाठी देखील राज्य सरकारने जागा उपलब्ध करुन द्यावी.

तसेच अयोध्येत भव्य बुद्ध विहार बांधण्यात यावं. ही संपूर्ण देशातल्या बौद्धांची मागणी असल्याचं आठवले म्हणाले.

बौद्ध विहाराच्या मागणीसाठी आम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊ, असंही आठवले म्हणाले आहेत.

Exit mobile version