ठाण्यात शिंदे समर्थकांच शक्तीप्रदर्शन

गुवाहाटीत पहिल्यांदाच शिंदे गटाची पत्रकार परिषद पार पडली तर दुसरीकडे ठाण्यात शिंदे समर्थकांचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती. तर शिंदेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन केले. त्यांना पाठींबा देण्यासाठी ठाण्यात रॅली काढण्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांना काय सांगण्यात आले होते ?
एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना शिवससंपर्क अभियानाचा संपूर्ण आढावा देण्यात आला होता. त्यावर त्यांना लेखी पत्र ही देण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारात आम्हा सर्व कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळवून द्या असेही त्यांनी सांगितले होते.
कार्यकर्त्यांच्या व्यथा
आपलेच नेते मुख्यामंत्री असूनही निधी मिळत नाही. निधी मिळाला तरी ते थांबवण्याण्याचे काम राष्टवादी काँग्रेसचे पालकमंत्री करतात. ‘निधी मिळत नसेल तर लोकांच्या विकासाची काम कशी करायची’, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारला होता.
विरोधात असताना असंतोष नव्हता तितका असंतोष सत्तेत असताना पाहायला मिळत आहे, असे वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या शिकवणीमुळे आम्ही शांत असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. तसेच धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत असेही ते म्हणाले.
आक्रमक शिवसैनिक कार्यालयावर हल्ले करत आहेत. त्यामुळे खरे शिवसैनिक असाल तर समोर या, असे थेट आवाहनही श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.