नाशकात शिवसैनिकांची निदर्शने

एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाटकानंतर नाशकातमध्ये शिवसैनिकांनी निदर्शने केली. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आले आहे. अनेक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंवर नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांना पाठींबा देण्यासाठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हे ‘शिवसेना झिंदाबाद, उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हे’ अशा प्रकारची घोषणाबाजी करत आहेत. त्याशिवाय मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या मीडियाशी संवाद साधताना मविआमध्ये फूट पडत आहे त्यामुळे भाऊक झाल्या होत्या.
एकनाथ शिंदे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये २० ते २५ आमदारांसह गेले होत. त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी मिलिंद नार्वेकर गेले होते. एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी असे वक्तव्य की, ‘शिवसेना हा पक्ष अटीशर्थींवर चालत नाहीत. या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदेंनी मोठा इशारा दिल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर शिंदेंना शिवसेनेच्या गटनेते पदावरून हटवण्यात आले आहे.
मुंबईतही शिवसेना भवन, वर्षा बंगला या ठिकाणीही शिवसैनिक आक्रमक झाले होते. अशाप्रकारे शिवसैनिक आपला पाठींबा दर्शवत आहेत.