Sun. Aug 18th, 2019

पोस्ट ऑफिस झालं ‘अॅप’डेट!

0Shares

सध्याच्या युगात सगळ्या गोष्टी मोबाईल-फ्रेण्डली झाल्या आहेत. पैशांचे व्यवहार करण्यासाठी बॅंकांही आपल्या अॅपचाच वापर करतात. एकमेकांना संदेश पाठवण्यासाठी व्हॉट्सअॅप सारखी अॅप्स प्रसिद्धच आहेत. तर आता हा अॅपचा फॉर्म्युला पोस्ट विभागानेही स्वीकारला आहे.

आपल्या ग्राहकांना सर्व सोयी सहजरीत्या उपलब्ध व्हाव्यात, त्यांचा पोस्टाच्या कार्यालयातल्या चालणाऱ्या प्रक्रियांमधून वेळ वाचावा यासाठी पोस्टानेही मोबाईल बॅंकिंगची सुविधा सुरू केली आहे.

या अॅपवरून सेवा सुरू करण्याची तारीख अद्याप निश्चित झाली नाही, मात्र ग्राहक या अॅपवर आत्तापासून नोंदणी करू शकतात.

कसं वापरायचं हे अॅप?

1. Google Play store वरून मोबाईल बँकिंग अॅपलिकेशन डाउनलोड करा. कृपया कोणत्याही इतर वेबसाइटवरुन डाउनलोड करू नका.

2. अॅप्लिकेशन ओपन करा आणि इन्स्टाॅल बटणावर क्लिक करा.

3. सर्व माहिती भरा.

4. ओटीपीच्या मॅसेजसाठी चार्ज लागणार नाही. ओटीपीचा मॅसेज आल्यावर तो ओटीपी नंबर टाका.

5. आपल्या निवडीची 4 अंकी MPIN नंबर टाका, त्यानंतर मोबाइल बँकिंग अॅप्लिकेशनमध्ये लॉग इन करण्यासाठी तुमचा यूजर आयडी आणि नवीन MPIN टाका.

 

मदत कक्ष –

आपल्याला कोणतीही अडचण आली असेल किंवा आपल्याला काही प्रश्न असतील तर या नंबरवर 18004252440 संपर्क साधा.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *