संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान झालं आहे. आषाढी वारी साठी पालखीचे त्र्यंकेश्वर मधून प्रस्थान झालं वारी साठी राज्यभरातून वारकरी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आहे. आषाढी वारीसाठी जाणाऱ्या महत्वाच्या पालख्यामधे निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा समावेश आहे. राम कृष्ण हरीच्या जय घोषाने त्र्यंबक नगरी दुमदुमली होती.
त्र्यंबकेश्वर राजाचं दर्शन घेऊन गाव प्रदक्षिणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम नाशिक जवळच्या सातपूर गावात असेल. या दिंडी सोहळ्यात महाराष्ट्रभरातून ठिकठिकाणाहून ४६ दिंड्या सहभागी होणार आहेत. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेली दोन वर्ष पायी वारीवर शासनाने निर्बंध घातल्याने शिवशाही बसने फक्त मानकऱ्यांसह २५ वारकरी पंढरपूरकडे रवाना होत होते. यामुळे वारकऱ्यांचा हिरमोडही झाला होता.
यंदा मात्र पायी दिंडीला परवानगी देण्यात आल्याने वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. कालपासूनच मोठ्या संख्यने वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे, कधी एकदा विठूरायाचं दर्शन घेता येईल याचीच वाट ते बघत आहेत. याआधी ६ जून रोजी गजानन महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं होतं. तर, ३ जूनला संत मुक्ताईचा आणि रूक्मीणी मातेचा पालखी सोहळा झाला होता.
महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता फोन आल्यावर नमस्तेऐवजी 'वंदे मातरम' म्हणणे बंधनकारक…
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना नुकताच…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर टीका…
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार ते पाच…
७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडला. यावेळी देशाला संबोधित…
देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शासकीय कार्यालये,…