Tue. Jun 28th, 2022

लष्कराच्या सहा नव्या तुकड्या तैनात

लेहमधील भारत-चीन सीमा सुरक्षा परिस्थितीबाबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. लडाख भागात लष्कराच्या सहा नव्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या तुकड्या आगोदर दहशतवादविरोधी भूमिका आणि पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. चीन सीमेवरील वाढता धोका लक्षात घेता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

चीनसोबत भारताचा सीमावाद दोन वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे, तेव्हा चिनी सैन्याने भारतीय चौक्यांवर मोठ्या प्रमाणात आपले सैनिक तैनात केले होते. त्यानंतर आता भारतीय लष्कर आपल्या सैन्याची पुनर्रचना करत आहे.अशा परिस्थितीत पाकिस्तानकडून येणा-या आव्हानांना आणि धोक्यांना तोंड देण्यासाठी अगोदर उत्तरेकडील सीमेवर ज्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्यांना आता चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षांत या लष्कराच्या दोन तुकड्या म्हणजेच सुमारे ३५ हजार सैनिक चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, राष्ट्रीय रायफल्सची एक तुकडी जम्मू-काश्मीरमधून बंडखोरीविरोधी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली होती. आता त्या तुकडीला पूर्व लडाख सेक्टरमध्ये तैनात करण्यात आले आहे.अशा परिस्थितीत पाकिस्तानकडून येणार्‍या आव्हानांना आणि धोक्यांना तोंड देण्यासाठी अगोदर उत्तरेकडील सीमेवर ज्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्यांना आता चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.