भीमा कोरेगाव विजयस्तंभास अलोट जनसागर, अजित पवार आणि आंबेडकरांनी केलं अभिवादन

भीमा-कोरेगाव विजयस्तभांस अभिवादन करण्यासाठी देशभरातून नागरिक येत आहेत. मोठ्या उत्साहात अनुयायी विजयस्तंभास अभिवादनासाठी दाखल होत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयस्तंभास येऊन अभिवादन केलं.
तसेच नागरिकांनी शांतता राखावी, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं.
यानंतर वंबिआच्या प्रकाश आंबेडकरांनी भीमा-कोरेगाव येथे येऊन विजयस्तंभास अभिवादन केलं आहे.
या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एकूण 400 पोलिस अधिकारी आणि 10 हजार पोलिसांचा फौजफाटा येथे उपस्थित आहे. यासोबतच पोलिसांकडून सोशल मीडजियावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
परिसरातील स्थानिक शाळांना शौर्यदिनानिमित्त सुट्टी देण्यात आली आहे.
भाविकांना विजयस्तंभास जाण्यासाठी विशेष बससेवेची सोय करण्यात आली आहे. पुणे-नगर मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.