पावसानंतर आता स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव!

सध्या पावसाचा जोर कमी झाला असला, तरी रोगराईने आता डोकं वर काढलंय. स्वाईन फ्लू ,मलेरिया, डेंग्यू यांसारख्या दुर्धर आजारांनी आता नागरिकांना हैराण केलंय. स्वाईन फ्ल्यू ने तर राज्यात 197 रुग्णांचा बळी घेतलाय. यातील 33 रुग्ण हे नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये आता स्वाईन फ्ल्यूची भीती निर्माण झाली आहे. सध्याचा घडीला नाशिक रुग्णालयात 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने थैमान घातलं होतं.

त्यामुळे नागरिक हैराण झाले होते.

पाऊस जास्त प्रमाणात पडल्यामुळे अनेकांचं नुकसान देखील झालं होतं.

नागरिक यातून जरा कुठे सावरतायत, तर आता रोगराईने डोकं वर काढलंय.

स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार आता वाढू लागलेत..पावसात साचलेली डबकी,वाढलेली दुर्गंधी,याला कारणीभूत ठरतीये.

स्वाईन फ्ल्यू सह डेंग्यूचे रुग्णदेखील शहरात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.

सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्ल्यूच्या विशेष कक्षात 5 स्वाईन फ्ल्यू सदृश रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

स्वाईन फ्लूपासून बचाव करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्या संदर्भात मागील काही दिवसांपूर्वी शासकीय रुग्णलयात विभागीय अधिकाऱ्यांनी बैठक घेण्यात आली. यामध्ये स्वाईन फ्ल्यू संदर्भात बचाव कसा लवकरात लवकर करता येईल अशा सूचना देखील आरोग्य विभागाला देण्यात आल्या होत्या.

मागच्या काही दिवसांपासून शहरात साथीचे आजार वाढत असल्याने गर्दीच्या ठिकाणी लोकांनी जाऊ नये असं आवाहनदेखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. स्वाईन फ्ल्यू संदर्भात नागरिकांनी येणाऱ्या गणेशोत्सव काळात विशेष काळजी घेण्याचं देखील आव्हान करण्यात आलंय.

स्वाईन फ्ल्यू मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे सरकारी पातळीवर याची लवकरात लवकर दखल घेणं गरजेचं आहे. तसंच आता येणाऱ्या गणपती उत्सवात देखील जनजागृती करणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे यावर उपाय योजना ही करण्याची गरज आहे, अन्यथा नागरिकांच्या जीवावर बेतू शकतं.

Exit mobile version