Sun. May 16th, 2021

जम्मू-काश्मीरमध्ये जमात-ए-इस्लाम या संघटनेवर 5 वर्षांची बंदी

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्धवस्त केलं.

त्याचा बदला म्हणून पाकिस्तानने भारतामध्ये घूसखोरी करण्याचा प्रयत्न केला.

सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे.जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात लपून बसलेले दहशतवाद्यांविरोध्यात जम्मू-काश्मीर पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली.

या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी पुलवामा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावात छापेमारी करत  जमात-ए-इस्लाम संघटनेनी 6 जणांना अटक केली आहे.

गृहमंत्रालयाने सामाजिक आणि धार्मिक संस्थांवर बंदी घातल्यानंतर सुरक्षा दलाने ही कारवाई केली आहे.

गेल्या आठवड्यात केलेल्या कारवाई पोलिसांनी १०० हून अधिक सामाजिक आणि धार्मिक संस्थेंच्या शेकडो कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ताब्यात घेतले होते.

जमात-ए-इस्लाम संघटना नेमकी काय आहे ?

जम्मू-काश्मीरमध्ये जमात-ए-इस्लाम या संघटनेची स्थापना 1942 साली झाली होती.

जमात-ए-इस्लामी या संघटनेवर राष्ट्रविरोधी काम करणे आणि कश्मीरमध्ये हिंसा भडकवल्याचा आरोप आहे.

आतापर्यंत या संघटनेवर 3 वेळा या  बंदी घालण्यात आली आहे.

पुलवामा  हल्ल्यानंतर मोदींनी ही संघटना देशातील सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेसाठी घातक असल्याचं सांगितलं.

या संघटनेवर कारवाई  करण्याची गृहमंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी गावात छापेमारी करत जमात-ए-इस्लाम या  संघटनेच्या  6 जणंना अटक केली.

या प्रकरणामध्ये जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात काही घूसखोर लपून बसले आहेत.

पोलिसांनी या संघटनेच्या सहा सदस्यांना अटक करण्यापूर्वी याच संघटनेच्या १५ जणांना अटक करण्यात आली होती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *