Sun. Sep 19th, 2021

अझहरसोबत अजित डोवाल नव्हतेच; राहुल गांधींचा आरोप फेटाळला

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अझहरची सुटका भाजप सरकारने केली असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. अझहरच्या सुटकेवेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल त्याच्यासोबत कंदहारला गेले होते, असा आरोप राहुल गांधी यांनी लावला होता. मात्र सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी हा आरोप फेटाळला आहे. जैशचा म्होरक्या मसूद अझहर याच्या सुटकेसाठी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या आयसी-८१४ विमानाला हायजॅक केले होते.

नेमकं प्रकरण काय ?

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे मसूद अझहरबरोबर विमानात होते असा आरोप राहुल गांधींनी लावला.

मात्र सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी हा आरोप फेटाळला आहे.

जैशचा म्होरक्या मसूद अझहर याच्या सुटकेसाठी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या आयसी-८१४ विमानाला हायजॅक केले होते.

दहशतवादी हे विमान अफगाणिस्तानातील कंदहार येथे घेऊन गेले होते.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारला डिसेंबर 1999 मध्ये मसूद अझहरची सुटका करावी लागली.

मसूद अझहरला ज्या विमाने कंदहारला नेण्यात आलं त्या विमानात अजित डोवाल नव्हते, असं वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं.

ओमर शेखनं अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लची हत्या केली.

आयसी-814 विमानातील 161 प्रवाशांचे प्राण वाचण्यासाठी वाजपेयी  सरकारने मसूद अझहरची सुटका करण्याचा निर्णय घेतला.

दहशतवाद्यांनी मागण्या मान्य झाल्या नाही तर विमानातील प्रवाशांची हत्या करण्याची धमकी दिली होती.

तसेच कुठल्याही अधिकाऱ्यांवर आरोप करता येऊ शकत नाही, असं सूत्रांनी सांगितलं.

अपहरणकर्त्यांनी सुरूवातीला भारताच्या तुरूंगात असलेले 36 दहशतवादी आणि 20 कोटी अमेरिकन डॉलर्सची मागणी केली होती.

मात्र  दहशतवाद्यांशी बोलताना डोवाल आणि गुप्तचर खात्यातील अन्य अधिकारी एन.एस.संधू , सी.डी.सहाय यांनी दहशतवाद्यांना त्यांच्या मागण्या मागे घेण्यास भाग पाडलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *