Tue. May 11th, 2021

‘चाईल्ड पोर्नोग्राफी’चा आरोप, अमेरिकेत भारतीय pilotला विमानातच अटक

‘चाइल्ड पोनोग्राफी’ हा गंभीर अपराध आहे. पाश्चात्त्य देशांत तर अशा अपराधाविरुद्ध कडक कायदे आहेत. असाच आरोपामुळे अमेरिकेमध्ये भारतीय pilot ला विमानातच अटक करण्यात आलं.

‘Child Pornography’ डाऊनलोड केल्याच्या आरोपावरून सोमवारी अमेरिकेत भारतीय वैमानिकाला अटक करण्यात आली. या pilot ला विमानातच प्रवाशांसमोर बेड्या घालण्यात आल्या. नवी दिल्लीहून निघालेलं विमान सॅनफ्रान्सिस्को विमानतळावर लँड होताना अमेरिकेतील कायदा अंमलबजावणी यंत्रणेकडून ही कारवाई करण्यात आली.

नेमकं काय घडलं ?

आरोपी pilot हा मुंबईचा असून एका भारतीय विमान कंपनीमध्ये अधिकारी पदावर आहे.

तो 50 वर्षांचा आहे.

या pilot कडे अमेरिकेला जाणाऱ्या विमानांच्या संचलनाची जबाबदारी होती.

विमानाच्या उड्डाणानंतर 15 मिनिटांच्या आत प्रवासी आणि क्रू ची सर्व माहिती अमेरिकेच्या ब्युरो ऑफ कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शनला द्यावी लागते.

FBI एजंट्सनी या pilot च्या अमेरिकेत येण्याची वाट पाहिली.

अमेरिकेत प्रवेश करताच आधी त्याला अटक केलं.

त्याचा पासपोर्ट जप्त केला आणि अमेरिकेचा व्हिसा रद्द केला.

नंतर त्याला दिल्लीला जाणाऱ्या विमानातून पाठवून दिलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

यापुढे त्या pilotला पुन्हा अमेरिकेला जाता येणार नाही.

या pilot वर चाइल्ड पोनोग्राफी डाऊनलोड करण्याचा संशय होता.

गेल्या दोन महिन्यांपासून एफबीआयचे एजंटस त्याच्यावर पाळत ठेवून होते.

अमेरिकेमध्ये हॉटेलमध्ये मुक्काम करताना आरोपी pilot इंटरनेटचा वापर कसा करतो, यावर लक्ष ठेवण्यात आलं.

FBIने त्या आधारे पुरावे जमा केले. या भक्कम पुराव्यांची फाईलच भारतीय यंत्रणेला पाठवून दिली.

मात्र यासंदर्भात pilot ज्या विमान कंपनीत कामाला आहे, त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

निव्वळ व्हिसाच्या कारणामुळे pilot ला परत पाठवून देण्यात आलं असल्याचं एअर लाइनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *