Mon. Jan 17th, 2022

#PulwamaTerrorAttack – पाकिस्तान म्हणे भारतानेच केला हल्ला!

जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान उलट्या बोंबा मारू लागलंय.  हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना  जैश-ए मोहम्मद ने जबाबदारी घेऊनही पाकिस्तानने मात्र भारतावरच उलटे आरोप केले आहेत. पाकिस्तानने पुलवामा हल्ल्याचा दोष भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या माथी मारायचा प्रयत्न केलाय.

पाकिस्तानचा RAW वर आरोप

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’ च्या वृत्तानुसार पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहमान मालिक यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणेला दोषी ठरवलं.

भारत प्रत्येक हल्ल्याचा आरोप पाकिस्तानवरच करत असतो, असं मलिक म्हणाले.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांचा खटला प्रलंबित आहे.

या प्रकरणावरून दुर्लक्ष करण्यासाठीच RAW ने पुलवामा येथे हल्ला केल्याचा आरोप रहमान मलिक यांनी केला आहे.

हे ही वाचा- कुलभूषण जाधव प्रकरणी १८ फेब्रुवारीपासून सुनावणी

हेमंत करकरे यांच्या हत्येमध्येही RAW चाच हात!

पाकिस्तानला गुन्हेगार ठरवता यावं यासाठी RAW ने ‘समझौता एक्सप्रेस’वरही हल्ला केला होता, असं मलिक म्हणाले.

मलिक याने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा उल्लेख करत अनेक आरोप केले.

हेमंत करकरे यांना ‘समझौता एक्सप्रेस’ हल्ल्यात RAW आणि RSSचा हात असल्याची माहिती होती.

त्यामुळे RAW ने त्यांना संपवलं, असा खोटा आरोप मलिक यांनी केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *