Wed. Oct 5th, 2022

भाजपाच्या खासदार सावित्रीबाई फुलेंची काँग्रेसमध्ये एंट्री

उत्तर प्रदेशच्या लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या बंडखोर खासदार सावित्रीबाई फुले यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सावित्रीबाई फुले यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी वाड्रा आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिधिया उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असूनही सावित्रीबाईंचा काँग्रेसमध्ये प्रवेश भाजपासाठी मोठा धक्का असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात होत आहे.

फुलेंमुळे उत्तर प्रदेशात भाजपाला दलित मतांचा मोठा आधार असल्या़चीही चर्चा होत आहे.

सावित्रीबाई फुले यांनी भाजप का सोडलं?

उत्तर प्रदेशच्या लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या बंडखोर खासदार सावित्रीबाई फुले यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये पदार्पण केले.

सावित्रीबाई फुले यांनी मागील वर्षी डिसेंबर मध्ये भाजपाला रामराम केला होता.

परंतु त्यांनी आपण कोणत्या पक्षात जाणार हे सांगितले नव्हते.

खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपा समाजात दुही निर्माण करत असल्याचा आरोप केल्यानंतर खळबळ उडाली होती.

तसेच त्यांनी राम मंदीर आणि दलितांवरील हल्ल्यांहून भाजपाला कारणीभूत ठरवले होते.

त्यांनी भाजपाला रामराम केला होता आणि परत कधीच भाजपात येणार नाही, असे जाहीर केलं होते.

त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे माजी खासदार राकेश सचान यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.