तिकीट दरवाढ होऊनही प्रवाशांची गर्दी कायम

राज्यात आजपासून एसटी बसच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली. एसटीची भाडेवाढ १७ टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीचे नवे दर लागू झाले असून तिकिट दरांत ५ रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र तरीही बसस्थानकांवर प्रवाशांच्या गर्दीचे चित्र कायम आहे.
कोरोनाकाळत आर्थिक डोलारा कोसळल्यामुळे एसटी महामंडळाने तीन वर्षांनंतर भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला. एसटीच्या तिकिट दरांत वाढ झाल्याने सामान्यांना एसटी प्रवासासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. तिकिट दरांत वाढ झाली असून अमरावती विभागीय बसस्थानकात प्रवाश्यांची गर्दी मात्र कायम आहे.