Thu. Dec 12th, 2019

‘या’ ट्रेन्स असतील 16 ऑगस्टपर्यंत रद्द!

पुणे-मुंबईदरम्यान रेल्वेच्या सर्व गाड्या येत्या रविवारपर्यंत रद्द केल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली असून, आता पुणे-मुंबईच्या डेक्कन क्वीन, प्रगती, सिंहगड आणि इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या 16 ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दररोज प्रवास करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे.

सातत्याने पडणारा पाऊस आणि खंडाळा ते कर्जत घाट क्षेत्रात दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे पुणे ते मुंबई शहरांना जोडणाऱ्या आणि विशेषत: नोकरदारांच्या गाड्या अशी ओळख असलेल्या या गाड्या रद्द केल्या आहेत.

तसंच, पुणे रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या अन्य लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द केल्या आहेत.

कोल्हापूर शहरातील पुरामुळे कोल्हापूरला जाणाऱ्या कोयना एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि सह्याद्री एक्स्प्रेस, तसंच मुंबई-गदग-मुंबई एक्‍स्प्रेस, पुणे-भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेस या गाड्या देखील 16 ऑगस्टपर्यंत रद्द केल्या आहेत.

पुणेमार्गे जाणारी यशवंतपूर-निजामुद्दीन एक्‍स्प्रेस दौंड-मनमाड मार्गे वळविण्यात आली आहे.

म्हैसूर-उदयपूर सिटी एक्‍स्प्रेस दौंड-पुणे मार्गे वळविण्यात आली आहे.

पनवेल-नांदेड एक्‍स्प्रेस 10 आणि 12 ऑगस्टला पुणे स्थानकातून धावेल, तर पनवेल-नांदेड विशेष गाडी 11 ऑगस्टला सोडण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *