…तो पर्यंत सरकारला काही होत नाही – अजित पवार

जोपर्यत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार , सोनिया गांधी यांच्या मनात जो पर्यत हे सरकार चालवायचे आहे, तो पर्यंत सरकारला काही होत नाही.
कुणी काही भविष्यवाणी करो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणत महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
आर आर पाटील यांच्या 5 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आर आर पाटील यांच्या तासगाव तालुक्यातील अंजनी गावामध्ये पुण्यस्मरण कार्यक्रमध्ये अजित पवार बोलत होते.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे देखील उपस्थित होते.
मुनगंटीवारांवर टीका
मुनगंटीवारांनी हे लक्षात घ्यावे की कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला येत नाही. सरकार आज आहे उद्या नाही हे मुनगंटीवारानी लक्षात घ्यावे, असे विनोदी शैलीत म्हणत मुनगंटीवाराचा अजित पवारांनी समाचार घेतला.
स्वच्छता अभियानासाठी ‘स्मार्ट व्हिलेज योजना’ असे या योजनेचे नाव आहे. आबांनी स्वच्छता अभियानासाठी मोठे काम केलं आहे.
यामुळे या योजनेला आर आर पाटील यांचे नाव देणार असून, या योजनेचा बक्षीस समारंभ आर आर पाटील यांच्या पुण्यतिथी दिवशी घेण्यात यावा, असे निवेदन मंत्रीमंडळसमोर ठेवणार आहे.
अशी घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केली.