Tue. Aug 9th, 2022

देवगिरी बंगला अजित पवारांना देण्यात येणार

राज्यात सत्तांतर आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अशातच, मलबारहीलमधील देवगिरी बंगाला चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यसरकारने अजित पवारांचा हट्ट पुरवला असून देवगिरी बंगला विरोधी पक्षनेते अजित पवारांना देण्यात येणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान होते. मागील अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पदावर काम करत असताना निवासस्थान म्हणून अजित पवारांना देवगिरी बंगला मिळाला होता. यामुळे अजित पवार यांना देवगिरी आपलासा वाटायला लागला. १९९९ ते २०१४ अजित पवार देवगिरी बंगल्यावरच राहत होते. पण २०१४ साली भाजपचं सरकार आल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देवगिरी बंगला मिळाला. २०१९ रोजी पुन्हा एकदा सत्तांतर झाल्यानंतर अजित पवार देवगिरी बंगल्यावर राहायला गेले. हा बांगला आपल्याकडेच राहावा यासाठी अजित पवार यांनी पत्र लिहून विंनती केली होती. त्यानुसार शिंदे सरकारने देवगिरी बंगला अजित पवार यांना मिळणार असल्याचे शासकिय परीपत्रक काढल आहे. सत्ताधाऱ्यांनी अजित पवार यांची इच्छा पूर्ण केली आहे. मागील अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पदावर काम करत असताना अजित पवार यांना देवगिरी बंगला मिळाला होता. आता तोच बांगला शिंदे सरकारने अजित पवार यांना पुन्हा दिला आहे.

देवेंद्र फडणवीस २०१९ साली विरोधी पक्षनेता झाल्यानंतर त्यांना सागर बंगला देण्यात आला. सागर बंगला मंत्र्यांसाठी आरक्षित होता, परंतु फडणवीस यांनी सागर बंगल्याची मागणी केली होती. महाविकासआघाडी सरकारनेही कोणताही आक्षेप न घेता फडणवीसांना सागर बंगला दिला. त्यानंतर आता अजित पवारांनी देवगिरी बंगल्यातच राहण्याचा आग्रह केला. त्यामुळे उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांनी परतफेड केली असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.