Tue. Jul 14th, 2020

पंधरवड्यात नियतीने आमचे दोन उमदे नेते हिरावून घेतले – मुख्यमंत्री

अवघ्या एका पंधरवड्यात नियतीने आमचे दोन उमदे नेते हिरावून घेतले आहेत. अगदी काल-परवाच सुषमाजी आमच्यातून निघून गेल्या.

आमचे थोर नेते श्री अरूण जेटलीजी यांची बातमी एकून अतिशय वाईट वाटले. मी अतिशय व्यथित आहे, तीव्र दु:खी आहे. अवघ्या एका पंधरवड्यात नियतीने आमचे दोन उमदे नेते हिरावून घेतले आहेत. अगदी काल-परवाच सुषमाजी आमच्यातून निघून गेल्या. श्री अरूण जेटलजी यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि कोट्यवधी भाजपा कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

एक उमदा विद्यार्थी नेता, आणिबाणीविरूद्ध कठोर संघर्ष करणारा नेता, मानवी हक्कांचा खंदा समर्थक, एक उत्तम आणि निष्णात विधिज्ञ आणि संघर्षशील नेतृत्त्व आपल्यातून कायमचे हिरावून घेतले गेले आहे.

प्रकृती प्रतिकूल असतानाही पडद्याआड आपल्या क्षमतांचा पूर्ण विनियोग करीत 2019च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना जवळजवळ प्रत्येक दिवशी ब्लॉगच्या माध्यमातून लेखन करीत प्रचारात स्वत:ला झोकून दिलेले पाहिले आहे. प्रकृती साथ देत नसतानाही अलिकडच्या काळात भाजपाच्या प्रत्येक बैठकांमध्ये त्यांना उपस्थित राहताना पाहिले आहे.

त्यांचा समर्पण भावच त्यातून दिसून येतो. देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, माहिती आणि प्रसारणमंत्री, विधी व न्याय विभागाचे मंत्री, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी देशाची केलेली सेवा कायम स्मरणात राहील. जीएसटीच्या अंमलबजावणीत सुद्धा त्यांनी दिलेले योगदान कायम अधोरेखित होत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *