देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली होती- सचिन सावंत

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्यात आलं आहे.
आता या पुस्तकावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कांग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक व्हिडिओ ट्विट करत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलं आहे.
काय म्हणाले सचिन सावंत ?
सचिन सावंत यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. देवेंद्र फडणवीस या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत.
भाजपकडून वारंवार शिवाजी महाराजांची अवमानना करण्यात आली आहे.
फक्त अजयकुमार बिश्त (योगी आदित्यनाथ), विजय गोयल आणि वादग्रस्त पुस्तकचं नाही.
तर देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली होती, असे सचिन सावंतानी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हंटंल आहे.
अधिक वाचा : ‘होय शरद पवार म्हणजेच जाणता राजा…’ जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर
तसेच हा व्हिडिओ 12 जानेवारी 2017 चा असल्याचं सचिन सावंताचं म्हणंन आहे.
तसेच भाजपकडून हे वारंवार केलं जात असल्याचं सचिन सावंत म्हणाले आहेत. यामुळे भाजपने बिनशर्त माफी मागायला हवी, अशी मागणी सचिन सांवत यांनी केली आहे.