Wed. Oct 5th, 2022

देवेंद्र फडणवीस कोरोनाबाधित

पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री तसेच बड्या नेत्यांना देखील बसला आहे. त्यातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. शनिवारी ताप आल्याने फडणवीस मुंबईत परतले आहेत.  देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी गृह विलगीकरणात आहे.’ट्विट करत त्यांनी सर्वाना माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी औषधं आणि उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान, याआधीही देवेंद्र फडणवीस यांना ऑक्टोबर २०२० मध्ये कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांनी सरकारी रुग्णालयात दाखल होत उपचार घेतले होते. आता पुन्हा एकदा त्यांना करोनाची लागण झाली आहे. पण ते घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.