Mon. May 17th, 2021

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे 22 वे विरोधी पक्षनेते ठरले आहेत.

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याची घोषणा नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर सभागृहातील पक्ष गटनेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात तसेच राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी देखील देवेंद्र फडणवीस याचे अभिनंदन केले.

देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. फडणवीस यांनी या मतदार संघातून सलग पाचव्यांदा विजय मिळवलेला आहे.

शनिवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित झाला. या ठरावानुसार महाविकास आघाडीकडे 169 आमदारांचे समर्थन आहे. तर भाजपचे 103 आमदार आहेत.

याआकडेवारीनुसार विधानसभेत भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपला विरोधीपक्षनेते पद मिळाले आहे.

दरम्यान आजच विधानसभेच्या सभापतीपदी नाना पटोले यांची निवड करण्यात आली.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *