Tue. Jan 18th, 2022

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून कोकणातील नुकसानीबाबत हे पत्र आहे. फडणवीस यांनी पूरग्रस्तासांठीच्या योजना पत्रात नमूद केल्या आहेत.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर सुमारे २६ ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर या मदतीसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत आपल्या सविस्तर मागण्यांसंबंधी एक पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. तातडीच्या आणि दीर्घकालिन अशा दोन्ही वर्गवारीत त्यांनी या मागण्या केल्या आहेत.

‘२०१९च्या पुराच्यावेळी मदतीचा काढण्यात आलेला शासन आदेश सुद्धा त्यांनी या पत्रासोबत जोडला असून, त्यावेळी एनडीआरएफ निकषांच्या बाहेर जाऊन कर्जमाफी, किरायाचे पैसे, दुकानदारांना मदत असे अनेक निर्णय घेण्यात आले होते. पीकांच्या नुकसानभरपाईचे तीन पट पैसे देण्यात आले होते. पुराचे संकट आणि सध्याचा कोरोनाची स्थिती पाहता या आदेशात आपल्याला काय अधिकच्या सुधारणा करता येतात, त्या पाहून आता मदतीचे आदेश तत्काळ काढण्यात यावेत. तसेच दीर्घकालिन उपाययोजनांबाबत जेव्हा-केव्हा आपण बैठकीचे नियोजन कराल, तेव्हा आम्ही उपस्थित राहूच’, असंही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मागण्या:

१. गाळ काढण्यासाठी नागरिकांना रोख पैसे द्या
२. मोबाईलने काढलेले फोटो हाच पुरावा ग्राह्य धरावा
३. मदतीसाठी स्वतंत्र निधी जाहीर करावा
४. पिकांच्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना तातडीने द्या
५. जनावरांच्या मृत्यूंची भरपाई तातडीने द्या
६. कोकणातील मच्छीमारांना मदत द्या
७. पुरात दुकानदारांचं नुकसान झालंय , त्यांनाही मदत करा
८. पडझड झालेल्या घरांचं पुनर्वसन करा
९. पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांची वीजबिल माफ करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *