Tue. Sep 28th, 2021

‘भाजपला श्रेय मिळेल म्हणून ठाकरे सरकारने आरक्षणाचा मुडदा पाडला’

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनी केलेल्या सर्व टीकांना लगेचच फडणवीस यांनी उत्तरे दिली.मराठा आरक्षण टिकलं असतं तर, भाजपला श्रेय मिळालं असतं म्हणून महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘अपेक्षेप्रमाणे आपले अपयश लपवण्यासाठी हे केंद्र आणि मागील राज्य सरकारवर सर्व ढकलत आहे. अशोक चव्हाण, नवाब मलिक खोटे बोलत आहेत.हे आरक्षण जर टिकले असते तर श्रेय भाजपला मिळाले असते म्हणून या सरकारने मराठा आरक्षणचा मुडदा पाडला आहे’, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

‘आम्ही उच्च न्यायालयाला सांगितले होते की आमचा कायदा १०२ व्या घटना दुरुस्तीच्या आधीचा आहे, आम्ही फक्त त्यात सुधारणा करतोय. हे महाविकास आघाडी सरकार कमी पडले.सध्या सरकार मराठा आरक्षणावरून हात झटकत आहे. केंद्र सरकारकडे पाठवू वगैरे बोलून चालणार नाही. तुम्हाला कारवाई पूर्ण करावीच लागेल’, असंदेखील फडणवीस यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *