Wed. May 18th, 2022

अवैध ठरावाला रद्द करण्यात आलं, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपच्या १२ आमदारांना मोठा दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे देवेंद्र फडणवीसांनी स्वागत केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अवैध ठराव रद्द करण्यात आले असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे. तसेच हा केवळ १२ आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता तर त्या मतदारसंघातील ५० लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आज लोकशाहीचे संरक्षण झाले असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याची मागणी भाजप नेते करत होते. तसेच निंलबन मागे घेण्यासाठी भाजप आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. कुठलेही कारण नसताना एक वर्षाच्या कालावधीसाठी निलंबन करणे हे असंवैधनिक आहे. केवळ कृत्रिम बहुमतासाठी ते करण्यात आले, हे आम्ही सुरूवातीपासूनच सांगत होतो. आज सर्वोच्च न्यायालयानेही तेच सांगितले असल्याचे, फडणवीसांनी सांगितले आहे. त्यामुळे आमदारांवर कारवाई करणाऱ्यांनी मतदारांची माफी मागावी, अशी मागणीसुद्धा फडणवीसांनी केली आहे.

‘वाईनबाबतचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा नाही’

तसेच किराणा दुकानात वाईन मिळण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर फडणवीसांनी भाष्य केले आहे. निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याची भूमिका मविआ सरकारने घेतली आहे. मात्र, मविआचा किराणा दुकानाता, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

2 thoughts on “अवैध ठरावाला रद्द करण्यात आलं, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

  1. Thanks for another essential posting. Where else could everyone get that kind of information in their normal complete way of crafting? I have a demonstration incoming week, and I am searching for such information. Have you considered promoting your blog? add it to SEO Directory right now 🙂 http://www.links.m106.com

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.