Tue. Jun 28th, 2022

देवेंद्र फडणवीस यांचा मविआवर हल्लाबोल

शनिवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानात जाहीर सभा घेतली. या सभेत शिवसेना पक्षप्रमुखांनी अनेक विषयावर भाष्य केले तर विरोधकांवर निशाणा साधला. त्यामुळे शिवसेनेच्या सभेनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील गोरेगाव येथे उत्तर सभा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला तर मविआ सरकारमधील नेत्यांवर टीकास्त्र केले.

फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी सभेत भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांची कालची सभा ही मास्टर सभा नाही तर लाफ्टर सभा होती, अशी टीका फडणवीसांनी केली. तसेच शिवसेनेची सभआ कौरवांची होती तर भाजपाची सभा ही पांडवांची आहे, असेही ते म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांचे भाषण हे सोनिया गांधी यांना समर्पित आहे, असे फडणवीस म्हणाले. यावेळी भाष्य करताना फडणवीसांनी कोविड काळात मविआ सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे, तसेच दाऊदचे सहकारी असणारे नेते मविआ सरकारच्या मंत्रीमंडळात असल्याची टीका करत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. तर, सरकारचे वर्क फ्रॉम जेल सुरू असल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे. हनुमान चालिसा सुरू होऊन लंका दहन होणार असूण मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

राणा दाम्पत्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आले होते. मात्र, राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली. यावर भाष्य करताना फडणवीस यांनी ‘स्व. बाळासाहेबांनी कधीव विचार केला असेल का की हनुमान चालिसाचे पठण करणे म्हणजे राजद्रोह असेल का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

फडणीवसांचा ओवेसींवर हल्ला

उत्तर सभेत देवेंद्र फडणवीसांनी अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावरही हल्ला केला. संभाजी महाराजांना मारणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर एमआयएमचे नेते दर्शन घेण्यास जातात. औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवतात. मात्र, तुम्ही पाहत राहिलात, अहो तुम्ही जरा लाज बाळगा, घोटभर पाण्यात बुडून जीव घ्या, असा टोला फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला.

‘बाबरीवरून शिवसेनेला मिरची लगी तो मै क्या करू?’

शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिदीवरून फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस जर तेथे गेले असते तर तुमच्या वजनानेच बाबरी खाली आली असती, असा टोला काल उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी वजनदार लोगोंसे संभालके रहना, असा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे. माझ्या वजनाने बाबरी पडली तर मला अभिमान आहे. माझ्यावर केवढा हा विश्वास असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच बाबरी आंदोलनात तुम्ही नव्हते असे म्हणालो तर मिरची लागली असेही फडणवीस म्हणाले. तसेच बाबरीवरून शिवसेनेला मिरची लगी तो मै क्या करू? असा सवालही फडणवीसांनी भाषण करताना उपस्थित केला. दरम्यान, गोळ्या चालतांना पाहिल्या आणि लाठ्या खाल्ल्या. तर मीच तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा खाली आणणार, असा इशाराही फडणवीस यांनी मविआ सरकारला दिला आहे.

‘देशात एकच वाघ आहेत आणि ते नरेंद्र मोदी आहेत’

दरम्यान, फोटो वापरून कोणीही वाघ होत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे. देशात एकच वाघ आहेत आणि तेही नरेंद्र मोदी आहेत, असे प्रत्युत्तर फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. तर पाकव्याप्त काश्मिरात अतिरेक्यांना ठार मारणारे मोदी हेच खरे हिंदू असल्याचेही फडणवीस म्हणाले.

मुंबईला तोडण्याची कुणाच्या बापाची औकात नाही, असा घणाघातही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. तसेच मुंबईचा बाप हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत. मुंबईचा बाप हा मराठी माणूस आहे. तसेच शिवसेना म्हणजे मुंबईचा बाप नाही, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.