बाळासाहेबांनी मांडलेल्या विचारांची आठवण प्रभू श्रीराम करुन देतील – फडणवीस

नवी मुंबईत आज भाजपचं महाअधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळेस त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. दरम्यान फडणवीस यांनी आपल्या भाषणात शिवसेनेचाही उल्लेख केला.
आपल्या भाषणादरम्यान फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल वक्तव्य केलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
आता अनेक जणं अयोध्येला जायला निघाले आहेत. त्यांनी जरुर जावं. ज्या अयोध्येकरता आम्ही बलिदान केलंय, त्या तिथे जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं, तर तुमचं खरं रक्त उफाळून येईल.
आणि हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. तुम्हाला प्रभू श्रीराम योग्य मार्गदर्शन करतील.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार मांडला, त्या विचाराची आठवण तुम्हाला प्रभू श्रीराम तुम्हाला करुन देतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ठाकरे सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यावर उद्धव ठाकरे अयोध्येला जातील, असं ट्विट शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केलं होतं.