Thu. Jan 27th, 2022

… म्हणून आम्ही सभात्याग केला – फडणवीस

उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत देण्याचं वचन दिले होते. पण त्यांनी ही मदत दिली नाही. हे सरकार विश्वासघातकी सरकार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर दिले. या भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि फडणवीसांनी टार्गेट केले. यानंतर फडणवीसांनी सभात्याग केला. सभागृहातून बाहेर येताच त्यांनी माध्यमांशी संवाद केला.

काय म्हणाले फडणवीस?

यावेळी फडणवीसांनी ठाकरे सरकारवर चांगलीच टीका केली. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या. पण त्यांनी दिलेल्या आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आम्ही सभात्याग केल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा होती. पण तसे काही झालं नाही. मुख्यमंत्र्यांनी यामुद्द्यासह अनेक मुद्द्यांना दुर्लक्ष दिल्याचं फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री हे खूर्ची वाचवण्यासाठीचे प्रयत्न करत आहेत. ते शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे. यासर्व प्रकारामुळे आम्ही आज सभात्याग केल्याच देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *