देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा – संजय राऊत

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांना खोचक सल्ला दिला आहे. देवेंद्रजी विरोधी पक्षनेता म्हणून कामाला लागा, असा सल्ला संजय राऊत यांनी सामना संपादकीय मधून दिला आहे.
तसेच या संपादकीयमधून भय्या जोशी यांच्या विधानाचा समाचार घेतला.
भय्या जोशी यांच्या त्या विधानाचं संपादकीयमधून हवाबाज विधान असा उल्लेख करण्यात आला आहे.
भय्या जोशी यांच्या विधानामुळे विरोधी पक्षांना मानसिक गुदगुल्या झाल्या असतीलही, पण राज्यात असं काही होणार नाही, असं संपादकीयमध्ये म्हटंल आहे.
देवेंद्र फडणवीस फार काळ विरोधी पक्षनेता राहणार नाहीत.
तसेच फडणवीस हे फार काळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही, असं विधान भय्याजी जोशी यांनी केलं होतं.
‘देवेंद्र फडणवीस फार काळ ‘माजी मुख्यमंत्री’ राहणार नाही’
तसेच या संपादकीयमधून भाजपवर घणाघात करण्यात आला आहे. भाजपने सत्तेचा गैरवाजवी वापर करत विरोधी पक्ष खरेदी विक्री संघ उघडला होता, असंही संपादकीयमधून म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस फार काळ विरोधी पक्षनेता राहणार नाहीत, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह भय्याजी जोशी यांनी केलं होतं.
देवेंद्र फडणवीस यांना फारकाळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही. त्यांच नशीब मोठं आहे, असंही भय्याजी जोशी म्हणाले होते.
नागपुरमधील एका कार्यक्रमात भय्या जोशी यांनी हे वक्तव्य केलं होतं.