Mon. Dec 6th, 2021

देवकुंड धबधब्याच्या प्रवाहात दोन पर्यटक वाहून गेले

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

देवकुंड धबधब्यात पर्यटक अडकल्याची घटना ताजी असतानाच आता दोन पर्यटक या धबधब्यात वाहून गेले. निसर्गरम्य असा देवकुंड धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. पण त्याचवेळी पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटनाही घडत आहेत. याच देवकुंडमध्ये दोघ जणं बुडाले आहेत. पण 24 तासानंतरही त्यांचा अजून शोध लागलेला नाही.

 

पुण्याचे दोन वेगवेगळे ग्रुप देवकुंड धबधब्यावर आले होते. यातल्या एका ग्रुपमधला 22 वर्षांचा मुलगा विपीन पाठक हा वाहून गेला. तर आर्मीच्या एका दुसऱ्या ग्रुपमध्ये असणारे लेफ्टनंट अश्विन चौधरी पाण्यात उतरले. पण तेसुद्धा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.

 

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये हे दोघेही पाण्यात वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरु होता. पण यात अपयशच आलं. स्थानिक तसंच राफ्टिंग क्लबच्या मदतीनं अजूनही शोधकार्य सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *