Sat. Sep 21st, 2019

श्रावणी सोमवारनिमित्त अर्धनारी नटेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

0Shares

आज शेवटचा श्रावणी सोमवार राज्यातील शंभूमहादेवाच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील  वेळापूर येथील पुरातन अर्धनारी नटेश्‍वर मंदिरामध्ये ही भाविकांनी पाहटे पासून गर्दी केली आहे.

श्री अर्धनारी नटेश्‍वराच्या मूर्तीची रचना अत्यंत कोरीव असून ही मूर्ती सालंकृत आहे.

शिल्पकलेच्या दृष्टीने अत्यंत उच्चप्रतीची शिल्पकृती आहे.

मूर्तीकाराने मूर्ती कोरताना वस्त्रांऐवजी अलंकाराचा वापर खुबीने केला आहे.

मंदिरात प्रवेश केल्यानंतर आतील नंदी, दक्षिणी भिंतीत ब्रह्मा, मद्विश्‍वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा अशा सात मातृका, वीरभद्र व गणपती आहे.

बाजूला उपदेवता, उत्तरेला शेजघर आहे. मुख्य गाभार्‍यात शिवलिंगावर सालंकृत शंकर-पार्वतीची मूर्ती उभी आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *