Sat. Jul 31st, 2021

श्रावण सोमवारनिमित्त घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

औरंगाबाद हे ऐतिहासिक आणि धार्मिक विविधतेने नटलेले शहर आहे. याच औरंगाबादपासून अवघ्या 32 किलोमीटर अंतरावर वेरुळ येथे महादेवाचं 12 जोतिर्लिंग आहे. हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जातो. या महिन्यांतील सोमवारी महादेवाच्या पूजेला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळेच शिवभक्त विविध ठिकाणच्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जातात. घुष्णेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने त्याला विशेष महत्त्वय. महाराष्ट्राततील हे पाचवे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी दर्शनाला येतात…

वेरुळ हे ऐतिहासिक आणि धार्मिक विविधतेने नटलेले गाव आहे.

याच ठिकाणी महादेवाच्या 12 जोतिर्लिंगपैकी एक असलेल्या घुष्णेश्वराचे मंदिर आहे.

देशात फक्त दोनच ज्योतिर्लिंग पूर्वाभिमुख आहेत. त्यातील एक मध्यप्रदेशतील महाकाल आणि दुसरं वेरुळचं घृष्णेश्वर…

या देशातील 10 जोतिर्लिंगाचं पाणी उत्तरेला जातं.

तर उजैन आणि घृष्णेश्वराचं पाणी पूर्वेला जातं. त्यामुळे याला अधिक महत्व आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.

नंतरच्या काळात घृष्णेश्वर मंदिर तसंच शिवालय तीर्थकुंडाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांनी केला असल्याचा उल्लेख येथील शीलालेखात आढळतो.

 

घृष्णेश्वर मंदिराची कथा

पूर्वी घृष्णा आणि सुदेहा अशा दोघी बहिणी होत्या. या दोन्ही भगिनींचा विवाह एकाच व्यक्तीशी झाला होता.

मात्र विवाहानंतर अनेक वर्षं दोघीही आपत्यहीनच होत्या.

दोघींपैकी घृष्णा शिवशंकराची कठोर भक्त होती. ती नियमितपणे महादेवाची पूजा करत असे.

तिच्या पुजेचं फळ तिला मिळालं.

शिवशंकराच्या आशीर्वादाने घृष्णेला पुत्ररत्न प्राप्त झालं.

मात्र या गोष्टीमुळे दुसरी बहीण सुदेहा दुःखी झाली.

मत्सरी वृत्तीच्या सुदेहाने घृष्णा शिवपुजेत लीन असतानाच तिच्या मुलाला ठार केलं आणि त्याचा मृतदेह नदीत फेकून दिला.

या घटनेची माहिती घृष्णेला मिळाली. तरीदेखील तिच्या शिवपुजेत खंड पडला नाही.

ती अविचलपणे पूजा करतच राहिली. तिचा आपल्या देवावर पूर्ण विश्वास होता.

महादेव शंकराच्या आशीर्वादाने झालेल्या पुत्राचं रक्षण महादेव स्वतःच करतील, असा तिचा विश्वास होता.

तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवाने तिच्या पुत्राला पुन्हा जीवंत केलं.

भगवान शंकराने घृष्णेच्या विनंतीवर या ठिकाणी ज्योतीरूपात वास्तव्य करायचं ठरवलं. तेव्हापासून या मंदिराला घृष्णेश्वर म्हटलं जातं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *