Thu. Jan 27th, 2022

मातेच्या मंदिरात शिरली मगर, भाविकांनी तिचीही केली पूजा !

गुजरातच्या महिसागर जिल्ह्यात खोडियार मातेच्या मंदीरात एक मगर अडकल्याची घटना घडली. अडकलेल्या मगरीला बघण्यासाठी  बघ्यांनी तुफान गर्दी केली.  एवढेच नाही तर काही भाविकांनी चक्क तिचीही पूजा केली.

मगरीवर कुंकू, फुले अर्पण करत भाविक पूजा करू लागले. मात्र या सगळ्या गोंधळातून गुजरात वन विभाग अधिकाऱ्यांनी  मगरीची सुखरूप सुटका केली आहे.

नेमकं काय घडलं ? 

गुजरातच्या महिसागर जिल्ह्यात खोडियार मातेच्या मंदीरात एक मगर अडकून पडली होती.

मंदिरात मगर पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

इतकेच नव्हे भाविक त्या मगरीला पाहात कुंकू, फुलं अर्पण करत पूजा करत होते.

दरम्यान मगर मंदीरात कशी शिरली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

गुजरात वन विभाग अधिकाऱ्यांना मगरीच्या सुटकेसाठी अथर प्रयत्न करावे लागले.

मात्र आता मगरीला सुखरूप मंदीराबाहेर काढण्यात वनविभागाला यश मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *