Tue. Sep 27th, 2022

‘एमपीएससी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार’; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

एमपीएससीकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात एमपीएससी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने इशारा दिला आहे.

एमपीसीकडून परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या परंतु या तारखा जाहीर होऊनही विद्यार्थ्यांना वयोमर्यादा शिथिल करण्यात आले नाही तसेच परिक्षा देण्याच्या मर्यादित वेळही वाढविण्यात आलेला नाही. एसी, एसटीप्रमाणे खुल्या वर्गातील आणि ओबीसी विद्यार्थ्यांनाही परीक्षेला अमर्यादित वेळा बसता यावे यासाठी लवकर परिपत्रक काढावे यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा, शिक्षक समितीचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी एमपीएससी कार्यालयावर कधीही धडक मारतील यातून कायदा सुव्यवस्था बिघडेल या सर्वस्वी जबाबदारी सरकारची आणि एमपीएससी कार्यालयाची राहील. असा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.