Fri. Aug 12th, 2022

कोल्हापुरात धनंजय महाडिकांचं जंगी स्वागत

राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी रंगलेल्या निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारली आहे. धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांना पराभूत करत राज्यसभेत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपाचे नवे खासदार धनंजय महाडिक प्रथमच कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी कोल्हापुरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

कोल्हापुरात धनंजय महाडिक यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर ताराराणी चौकात जल्लोषाचे वातावरण आहे. महाडिकांच्या समर्थकांमध्ये चांगलाच उस्ताह पाहण्यास मिळाला. ढोल-ताशांचा गरजात गुलालाची उधळण करत महाडिक समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच कोल्हापूर गुलाल उधळवण्या आला. तर धनंजय महाडिक आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील गुलालात न्हायल्याचे चित्र पाहायला मिळाले.

धनंजय महाडिक यांच्या स्वागतासाठी कोल्हापुरात समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाल. तसेच महाडिक राज्यसभेची निवडणुक विजयी झाल्यामुळे पुन्हा कोल्हापुरात महाडिक पर्व सुरु झाल्याचा जल्लोष समर्थक साजरा करत आहेत.

राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. मात्र, अखेर सहाव्या जागेसाठी संजय पवारांना पराभूत करत भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक-एक उमेदवार विजयी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.