Jaimaharashtra news

ही एक प्रकारची अघोषित आणीबाणी – धनंजय मुंडे

“मनसेचे चांगले कार्यकर्ते संदीप देशपांडे यांना कारण नसताना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसंच मनसेच्या कार्यकर्त्याची धरपकड चालू आहे. ही एक प्रकारची अघोषित आणीबाणी आहे” असा आरोप राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केलाय. हिंगोली येथे शिवस्वराज्य यात्रेदरम्यान धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली.

“देशात लोकशाहीचा गळा दाबणारे राज्यकर्त सत्तेत बसले आहेत. अघोषित आणीबाणी लावली. भाजप, मोदी, शहांच्या विरोधात येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे राज ठाकरे यांनी बोलू नये, या करता ED ची नोटीस पाठवली. वीस वर्षांनंतर ईडी नोटीस कसं पाठवू शकतं? असा प्रश्न मुंडे यांनी विचारला.

लोकशाहीत विरोधक टीका करत असतात. त्यातून सत्ताधाऱ्यांनी चुका दुरुस्त करायच्या असतात.

UPA च्या काळात राज ठाकरे यांनी आघाडी सरकारवर भयंकर टीका केली होती. मात्र UPA कधी सूडबुद्धीने वागली नाही.

जनता सर्व पहात आहे. भाजप सेनेच्या या प्रकाराला जनता भीक घालणार नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.

Exit mobile version