Wed. Jul 28th, 2021

बऱ्याच मतदारसंघात झालेल्या मतदानापेक्षा मोजलेले मतदान जास्त याचा अर्थ काय? – धनंजय मुंडे

लोकसभा निवडणुकांचा निकालात भाजपाने काँग्रेसवर जोरदार विजय मिळाला आहे. निवडणुकांच्या आधीपासूनच विरोधक EVM वरती टीका करत होते. निवडणुकांचे निकाल लागले तरी या टीका सुरुच आहेत. बऱ्याच राज्यांत झालेल मतदान आणि मोजलेलें मतदान या मध्ये तफावत आढळून आली आहे. असा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी बीड मधील पत्रकार परिषदेत केला आहे. राजू शेट्टींनी देखील हातकणंगले मतदार संघात एकूण मतांपेक्षा जास्त मते मोजण्याचा प्रकार उघड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

बऱ्याच राज्यांत झालेल मतदान आणि मोजलेले मतदान या मध्ये तफावत आढळून आली आहे.

महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदार संघात 200, 300, 500 अशी तफावत अढळली आहे.

बीड मतदार संघात 600 मतांची तफावत आहे. यांचा आर्थ काय?

या बाबतीत आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली आहे असं ही ते म्हणाले आहेत.

धनंजय मुंडें यांनी बीड मधील पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहे.

राजू शेट्टींचाही EVM वर निशाणा

खासदार राजू शेट्टी यांच्या मतदार संघात एकूण मतांपेक्षा जास्त मते मोजण्यात आली आहे.

हातकणंगले मतदार संघात 12 लाख 45 हजार 797 इतक्या लोकांनी मतदान केले होते.

मात्र मतमोजणीच्या दिवशी 12 लाख 46 हजार 256 इतकी मतांची मोजणी झाली आहे.

459 इतकी अधिकची मते आलीत कोठून असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

त्यातच आता मतांच्या संख्येत वाढ दिसत असल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत.

निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा शेट्टींनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *