Jaimaharashtra news

सभेला कमी गर्दीमुळे मोदींच्या पायाखालची वाळू सरकली – धनंजय मुंडे

लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच अससल्यामुळे राजकीय पक्ष प्रचार करण्यासाठी सज्ज झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धामध्ये सभा घेत महाराष्ट्रात प्रचाराचा नारळ फोडला. वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात भाजपाची पहिली जाहीर सभा पार पडली. मात्र या सभेसाठी नागरिकांची कमी गर्दी पहायला मिळाली. सभेला नागरिकांनी कमी प्रतिसाद दिल्यामुळे विरोधकांनी यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करत या सभेबाबत टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांचे नेमकं ट्विट काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात सभा घेतली.
यावेळी मोदींनी विरोधकांवर घणाघाती टीका केली.
तसेच या सभेला नागरिकांनी अपेक्षेहून खूपच कमी गर्दी केल्यामुळे विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करत टीका केली आहे.
वर्धा सभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे नक्की.
२०१४ साली दिलेल्या आश्वासनांचा कित्ता गिरवून सत्तेची आस लावून घेण्यात अर्थ नाही हे त्यांनी जाणावे.
तसेच बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचा चढता आलेख पाहता कुंभकर्ण कोण ते स्पष्टच आहे, असे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Exit mobile version