Tue. Jun 15th, 2021

कितीही भांडले तरी एकत्रच, धनंजय मुंडेचं #ValentinesDay

विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाइन डे च्या निमित्त साधत  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटद्वारे लक्ष केलं आहे.

दोघांचा एकत्र फोटो ट्विट करत यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? असा टोला मारला आहे.

 काय म्हणाले धनंजय मुंडे?

    • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकत्र फोटो ट्विट  करत ‘यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? असा प्रश्न धनंजय मुंडे  विचारला आहे.
    • गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच… केवढा तो एकमेकांवर जीव… नाही का?’ असा टोलाही मारला आहे.
    • ट्विटमध्ये त्यांनी व्हॅलेंटाइन डेचा हॅशटॅगही दिला आहे.

राज्यात भाजपा-शिवसेना युतीचं सरकार असूनही शिवसेनेने नेहमीच विरोधकांची भूमिका घेतली आहे.

गेल्या पाच वर्षात शिवसेनेने अनेकदा सत्तेतून बाहेर पडू असा फक्त इशाराचं दिला आहे.

याचाचं आधार घेत धनंजय मुंडे यांनी शिवसेना-भाजपाला टोला लगावला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *