Wed. Oct 5th, 2022

“निवडणुकीत मतं मागायला या, तुमचे स्वागत दगडानेच करतो!”

‘टीस’चा अहवाल विरोधात गेल्याने धनगर समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘टीस”च्या नावाखाली राज्य सरकारने चार वर्षे वेळ मारून नेली. चार वर्षानंतर प्राप्त करून घेतलेला अहवाल धनगरांच्या विरोधात तयार केला गेला असल्याचा दावा धनगर समाजाकडून केला जात आहे.

‘फसव्या सरकारने आता निवडणुकीत मते मागायला या, तुमचे स्वागत दगडानेच करतो,’ अशा संतप्त भावना धनगर समाजातून व्यक्त केल्या जात आहेत.

भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. ‘टीस’ला घटनात्मक अधिकार नसतानाही या संस्थेचा अहवाल माथी मारुन ४ वर्षे वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले आणि आता धनगर आणि धनगड या भिन्न जाती आहेत, असा जावाईशोध लावल्याचा आरोप धनगर समाजाकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.