Wed. Jun 29th, 2022

धनराज महाले यांचा शिवसेनेत प्रवेश; विधानसभेपूर्वी घरवापसी

विधानसभा निवडणुकांपूर्वी दिंडोरीचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे नेते धनराज महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकांवेळी धनराज महाले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यापूर्वी धनराज महाले शिवसेनेत होत म्हणून त्यांनी घरवापसी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना दिंडोरी येथून तिकीट देण्यात आले होते. मात्र त्यांचा पराभव झाला.

धनराज महाले यांची शिवसेनेत घरवापसी –

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनराज महाले यांनी शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

धनराज महाले हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत.

2014 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

2019च्या लोकसभा निवडणुकींपूर्वी शिवसेनाला राम राम म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

दिंडोरी येथून राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली.

मात्र भाजपाच्या भारती पवार यांनी बाजी मारल्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे.

लोकसभा निवडणुकीतच भारती पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला होता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.