Sun. Jun 20th, 2021

‘कोलावरी डी’ स्टार धनुष आणि अनिरुद्ध पुन्हा एकदा पडद्यावर करणार धमाल

‘कोलावरी डी’ स्टार धनुष आणि अनिरुद्ध पुन्हा एकदा चर्चेत…

तामिळ चित्रपट सृष्टीतील सुप्पर स्टार धनुष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धनुष सध्या ‘अत्रंगी रे’ या चित्रपटासाठी काम करत आहे. हा चित्रपट आनंद एल राय दिग्दर्शित केला आहे, ज्यामध्ये सारा अली खान अक्षय कुमार धनुषचे सहकलाकार असणार आहे.

धनुषने बॉलिवूडमध्ये पदार्पण रांझणा चित्रपटपासून केलं होतं. साऊथमध्ये ‘कोलावरी डी’ या गाण्यानं धनुष आणि अनिरुद्ध रविचंद्र फार प्रसिद्ध मिळून दिली तर ‘कोलावरी डी’ हे गाणं जगात लोकप्रिय ठरलं.

सन पिक्चर्स निर्मित, ‘डी 44’ ऊर्फ ‘धनुष 44’ या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा धनुष आणि अनिरुद्ध पडद्यावर मोठा धमाका करायला येत आहे . ‘डी 44’ याद्वारे चाहत्यांना धनुष एन अनिरुद्ध (डीएनए)  एकत्र प्रेशकांच्या भेटीला येत आहे. 

अनिरुद्ध या चित्रपटासाठी संगीत देणार अशी बातमी समोर येताचं चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ‘धनुष 44’ हे मिथ्रान जवाहर दिग्दर्शित आहेत.
दहा वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या उथमपुतिरनच्या यशानंतर या चित्रपटात धनुष-मिथ्रान जवाहर जोडीची एकत्र काम करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *