Sun. Oct 17th, 2021

812 धोकादायक इमारती रिकाम्या केल्या नाही तर…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

धोकादायक इमारती रिकाम्या करण्यास तयार नसणाऱ्या रहिवाशांना मुंबई पालिकेने 30 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत इमारती सोडल्या नाहीत तर 30 एप्रिलपासून इमारतींचे पाणी कापण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

 

धोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणात तब्बल 812 इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले. पावसाळय़ात इमारती कोसळून जीवितहानी होऊ नये म्हणून दरवर्षी पालिकेतर्फे 30 वर्षे जुन्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते.

 

अत्यंत धोकादायक अशा या इमारती कोणत्याही क्षणी कोसळतील अशा अवस्थेत असून त्या तत्काळ रिक्त करून जमीनदोस्त करणे आवश्यक आहे. या यादीमध्ये सरकारी, खासगी आणि महापालिकेच्या मालकीच्या अशा सर्वच इमारतींचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *