Wed. Jun 19th, 2019

धोनीच्या ग्लोव्ह्जवरील ‘ते’ चिन्ह काढून टाका; ICCचे BCCIला आदेश

0Shares

World Cup 2019ला सुरुवात झाली असून पहिलाच सामना दक्षिण आफ्रिकासोबत पार पडला. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. मात्र या सामन्यात पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटकडे असलेले विशेष बलिदान चिन्ह महेंद्रसिंह धोनीने आपल्या ग्लोव्ह्ज वापरले. मात्र त्या चिन्हावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

भारताचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकासोबत रंगला होता.

या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने नाबाद खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.

रोहित शर्माला महेंद्रसिंग धोनीने सुद्धा चांगली साथ दिली.

मात्र दक्षिण आफ्रिका फलंदाजी करत असताना यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने एक वेगळे ग्लोव्ह्ज वापरले होते.

या ग्लोव्ह्जवर पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटकडे असलेले विशेष बलिदान चिन्ह होते.

त्यामुळे या ग्लोव्ह्जवरील चिन्ह काढून टाकण्याचे आदेश ICCने BCCIला दिले आहे.

नेमकं ते चिन्हाचा अर्थ काय ?

महेंद्रसिंह धोनीने आपल्या ग्लोव्ह्जवर बलिदान चिन्ह लावले आहे.

हे चिन्ह कोणालाही वापरण्याची परवानगी नाही आहे.

हे चिन्ह पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटच्या सदस्यांना वापरण्याची परवानगी मिळते.

या चिन्हाला बलिदान चिन्ह असे नाव देण्यात आले आहे.

देवनागरी लिपीमधून बलिदान असे लिहीलेले असून चांदीपासून हे चिन्ह बनवलं जातं.

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: